शिर्डी - ईडी चौकशीला एव्हढ घाबरता कशाला, तुम्ही काही केल नसेल तर सुखरुप बाहेर पडाल. मात्र, स्टंटबाजी करु नका, आता मविआचे सरकार नाही. असे भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) यांनी म्हटले आहे. आता शिंदे फडणवीसांच सरकार ( Shinde Fadnavis Govt ) आहे. तुमची स्टंटबाजी उधळून लावली जाईल. असा सज्जड दमही त्यांनी काँग्रेस कार्यकत्यांना दिला. बावनकुळे आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनसाठी आले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
काँग्रेसच्या आंदोलनावर जोरदार टिका - सोनीया गांधीच्या ( Sonia Gandhi ) ईडी चौकशी वरुन राज्यात काँग्रेसकडून सुरु असलेल्या आंदोलनावर बावनकुळे यांनी जोरदार टिका केली आहे. काँग्रेसची स्टंटबाजी तपास यंत्रणांवर दबाब आण्यासाठी असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार नाही, शिंदे फडणवीसांच सरकार तुमची स्टंटबाजी चालू दिली जाणार नाही असे त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे. गांधी परीवाराला ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर कॉग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळन लागले असुन नागपुरात एक गाडीही पेटविण्यात आली आहे. या विषय बोलतांना बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांनी एक भंगारातील गाडी आणुन पेटवली आहे. जाळपोळ करण्याची काँग्रेसची हिंमत नाही. राज्यात फडणवीस शिंदेच सरकार आहे. हे सरकार महाविकास आघाडीच नाही. त्यामुळे आता स्टंटबाजी करु नका असा टोला त्यांनी काग्रेसला लगावला. विरोधी पक्ष म्हणुन तुम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे त्या दृष्टीने तुम्ही काम करा. जी स्टंटबाजी तुम्ही चालवली आहे. ती सरकार उधळवून लावेल असा ईशाराही बावनकुळे यांनी विरोधी पक्षांना दिला.
काँग्रेलला भाती कशाची? - हेराल्ड प्रकरणावरुन ( National Herald case ) सोनिया गांधीना ईडीने चौकशीसाठी बोलविले ( Sonia Gandhi questioned by ED ) आहे. ती मागणी भारतीय जनता पक्षाने केलेली नव्हती. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांची चौकशी होते आहे. नोटीसा आल्यानंतर त्या पुढे जावून शासकीय विभागाने आपले म्हणने मांडायचे असते. आपण जर, काही काळबैर केल नसेल तर तुम्हाला भिती कशाची? त्यामुळे ईडीच्या नोटीसा आल्यानंतर जे आंदोलन केली जातात ती तपास यंत्रणांवर दबाव आणन्यासाठी केली जात आहेत. न्यायालयाने सांगीतल्या नुसार चौकशी होतेय. मात्र, यांचे कार्यकर्ते केवळ तपास यंत्रणांवर दबावासाठी आंदलोन करता आहेत असा आरोप बाववकुळे यांनी केला.