अहमदनगर -नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे पर्यटन विकास योजनेंतर्गत सुमारे साडे चार कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या विकास कामांचा शुभारंभ राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. 'महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. मात्र, आपल्याच दिव्याखाली अंधार आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आपणच आपल्या पर्यटन स्थळांना महत्व देत नाही', अशी खंत जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली.
आपणच आपल्या पर्यटन स्थळांना महत्व देत नाही- पर्यटनमंत्री जयकुमार रावल - महाराष्ट्र
सद्या महाराष्ट्रात पर्यटनाचा मोठा खजिना आहे. पण 'दिव्या खाली अंधार' अशी परिस्थिती आहे. प्रत्येक गड-किल्ले व पर्यटन क्षेत्राला सर्वांनी भेटी देणे गरजेचे आहे. या इतिहासकालीन वास्तूमधूनच भविष्यात जगण्याची प्रेरणा मिळते- पर्यटनमंत्री जयकुमार रावल
पर्यटन विकासाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्याचा आपण प्रयत्न करणार असून, महाराष्ट्रात पर्यटनाचा मोठा खजिना आहे. पण दिव्या खाली अंधार अशी परिस्थिती आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी बोलताना केले. देवगड ही तपस्वी सदगुरू किसनगिरी बाबांची तपोभूमी म्हणून राज्यासह देशभरात ओळखली जाते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून नगर जिल्हा हा संतांची राजधानी असल्याचे गौरवोद्गगार त्यांनी यावेळी काढले. सद्या महाराष्ट्रात पर्यटनाचा मोठा खजिना आहे. पण 'दिव्या खाली अंधार' अशी परिस्थिती आहे. प्रत्येक गड किल्ले व पर्यटन क्षेत्राला सर्वांनी भेटी देणे गरजेचे आहे. या इतिहासकालीन वास्तूमधूनच भविष्यात जगण्याची प्रेरणा मिळते, असे रावल यांनी यावेळी म्हटले आहे.