महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डीमध्ये वाकचौरेंचा ठाकरे गटात प्रवेश तर शिंदे गटाचे खासदार लोखंडे ॲक्टिव्ह - शिर्डी लोकसभा मतदार संघ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागला आहे. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघातही दोन्ही सेनेची पक्ष बांधणी सुरू आहे. उध्दव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरेंना शिर्डीतून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे शिर्डीत शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडेही पक्ष बांधणीसाठी बैठका घेताहेत. जनता माझ्या मागे उभी राहील, असे त्यांनी जाहीर केले आहे.

Shirdi Lok Sabha Constituency
वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 5:08 PM IST

सदाशिव लोखंडे आपले मत मांडताना

अहमदनगर (शिर्डी) :आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करतायत. शिर्डी लोकसभा मतदार संघातही दोन्ही सेनेची पक्ष बांधणी सुरू आहे. उध्दव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरेंना पुन्हा आपल्याकडे घेतलंय. दुसरीकडे शिर्डीत शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडेही पक्ष बांधणीसाठी बैठका घेताहेत. जनता माझ्या मागे उभी राहील, असे सांगत लोखंडेनी निवडणुकीत वाकचौरेंचा सामना करायची तयारी दर्शवली आहे.

उमेदवार देण्याचा प्रत्येकाला अधिकार :शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिर्डीत पार पडली. पक्ष संघटन वाढीसाठी ही बैठक घेण्यात आली आहे. कालच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी उध्दव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला. शिर्डीचे तिकीट ठाकरे वाकचैरेंनाच देणार असल्याने सदाशिव लोखंडे यांनी आता तयारी सुरू केली आहे. आम्हाला शिर्डी लोकसभेची चिंता नाही. प्रत्येकाला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याचे यावेळी लोखंडे म्हणाले आहे.

जनतेचा निर्णय मान्य करू :2014 ला 17 दिवसांत खासदार झालो होतो. या मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सुरू आहेत. निवडणुका म्हटल्यानंतर पक्षाची जबाबदारी वाढली असते. त्याच बरोबरीने जनता ज्याला मतदान करणार ते स्वीकारण्याचे काम आम्ही करणार असून जनता जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. खोटं बोलून काही गोष्टी चालत नाही असे मत लोखंडे यांनी मांडले.


शिवसेनेची मातोश्रीवर बैठक :सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई काँग्रेसने आढावा बैठक घेतली. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटानेही मातोश्रीवर सर्व जिल्हाप्रमुख, आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याचे चित्र आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपण भाजपासोबत जाणार नाही आणि महाविकास आघाडीतच असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीने वातावरण अधिक गढूळ झाले आहे.

हेही वाचा:

  1. 'INDIA' Meeting Mumbai : 'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीत लोगो होणार लॉन्च?
  2. Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी का पाठवले उद्धव ठाकरे यांना बर्नोल?
  3. Sanjay Raut on Sharad Pawar Photo : गुरुदैवताच्या पाठीत खंजीर खुपसता आणि त्यांचाच फोटो लावता; संजय राऊतांनी फटकारले

ABOUT THE AUTHOR

...view details