अहमदनगर - नेवासा तालुक्यातील भेंडा गावातील मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी झाली होती. पण, अद्याप चोरांचा शोध लागला नाही. त्यामुळे, ग्रामस्थांनी नेवासा शेवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत चोरांना अटक करण्याची मागणी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा गावातील ग्रामदैवत श्री संत नागेबाबा मंदिरातील दानपेटी चोरटयांनी उचलून नेली होती. तर गावातील सोनाराच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखो रूपांचे सोने चोरटयांनी नेल्याची घटना घडून आज तब्बल तीन दिवस झाले आहेत. मात्र, आद्यापही पोलिसांनकडून या चोरांचा शोध लागला नाही.