अहमदनगर - सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वात आधी राधाकृष्ण विखे पाटलांनी निषेध करायला हवा होता,असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. विखेंनी सुजयला रोखायला हवे होते. ते त्यांनी केले नाही. हे वागणे विखेंना शोभत नाही,अशा कडवट शब्दात थोरातांनी नाराजी व्यक्त केली.
हे वागणे विखेंना शोभणारे नाही; बाळासाहेब थोरातांची टीका - THORAT
काँग्रेस पक्षाने आतापर्यंत विखे कुटुंबीयांना भरभरुन दिले. मागेल ती पदे दिली. ही वेळ पक्षाला उतराई होण्याची होती. मात्र, पुत्रहट्टापुढे विखे पाटील झुकले.
काँग्रेस पक्षाने आतापर्यंत विखे कुटुंबीयांना भरभरुन दिले. मागेल ती पदे दिली. ही वेळ पक्षाला उतराई होण्याची होती. मात्र,पुत्रहट्टापुढे विखे पाटील झुकले. त्यांनी मुलाला समजून सांगायला हवे होते. त्याला रोखायला हवे होते. विखे घराण्याचे वागणे अहमदनगरच्या जनतेलाही आवडणार नाही,असे थोरात म्हणाले.
पक्ष सांगेल ते मी करेल,असे विखे म्हणतात. पण,ते मुलाला रोखण्यात अपयशी ठरले. याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागेल. ते आता काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे,असे थोरात यांनी सांगितले. विखे राजीनाम देऊन भाजपमध्ये गेले तर तुम्ही विरोधी पक्षनेतेपद स्वीकाराल काय,असा प्रश्न वार्ताहरांनी विचारला. त्यावर थोरात म्हणाले,की पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी आजवर इमानेइतबारे सांभाळली आहे. यापुढेही सांभाळेल.