अहमदनगर - जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. याआधी त्यांनी आपल्या गावातील ग्रामदैवत म्हसोबाचे दर्शन घेतले. भाजप नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, खासदार सुजय विखे, धनश्री विखे यांनी लोणी येथील पुण्यश्लोक आहिलाबाई होळकर माध्यमिक विद्यालयात जाऊन मतदान केले.
विखे-थोरात कुटुंबीयानी बजावला मतदानाचा हक्क यावेळी मतदान केंद्रवरील पोलिसांनी चित्रीकरण करण्यास पत्रकारांना मज्जाव केला आहे. तर दुसरीकडे सकाळी 8 वाजता संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही सपत्नीक आपल्या जोर्वेगावात मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा -सिंधुदुर्गात मतदानाला सुरुवात; सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह
यावेळी राज्यात महायुतीचेच सरकार येईल आणि महायुतीला 220च्या वर जागा मिळतील, असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा निषेध देखील त्यांनी केला.
विखे-थोरात कुटुंबियानी बजावला मतदानाचा हक्क हेही वाचा -अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मुलगी समीहाचं पहिलंच मतदान
तर दुसरीकडे सकाळी 8 वाजता संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सपत्नीक आपल्या जोर्वेगावात मतदानाचा हक्क बजावला. थोरात यांनीही राज्यात महाआघाडीचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्रीही आघाडीचा येणार असे म्हणत, राज्यात महाआघाडीला 160 जागा येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना सोशल मीडिया हे अत्यंत चांगला आहे. मात्र, त्याचा वापर चांगल्या रितीने केला पाहीजे. एखाद्या फाईलमध्ये काही एडीट करुन पसरविणे, चुकीचे असल्याच मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -बारामतीत सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालयात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच अकोले विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार वैभव पिच्छा, माजी आदिवासी मंत्री मधुकर पिच्छा यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बाजवला. तर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे, नेवासाचे भाजप उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनीही सहकुटुंब मतदान केले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते 9 वाजे पर्यंत टक्के झालेले मतदान -
शिर्डी विधानसभा 4.21%
नेवासा विधानसभा 7.4%
संगमनेर विधानसभा 7.94 %
कोपरगाव विधानसभा 4.76%
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तसेच राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
हेही वाचा -मतदानावर पावसाचे सावट; विक्रम मतदानाचा होणार की पावसाचा..?
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.