अहमदनगर- अहमदनगर दक्षिणेतून लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या डॉ सुजय विखेंच्या पाठीशी युतीची ताकत आहे. तो निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे म्हणतविरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सुजय यांचा निर्णय एकप्रकारे योग्य असल्याचे सूचित केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने विरोधी पक्षाचे स्टार प्रचारक असलेले विखे नेमके आघाडीचा प्रचार करताहेत, की युतीचे उमेदवार असलेल्या आपल्या मुलाची भलावण करताहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुजयच्या पाठीशी युतीची ताकत, तो योग्यच निर्णय घेईल; राधाकृष्ण विखेंकडून मुलाचे कौतुक - vikhe
राधाकृष्ण विखे यांचे हे वक्तव्य पाहता ते सुजय विखे यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत आघाडी धर्माला छेद देत असल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, हे एका तर्काला अनुसरून त्यांनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली असली तरी राधाकृष्ण विखे यांचे हेवक्तव्य पाहता ते सुजय विखे यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत आघाडी धर्माला छेद देत असल्याचे समोर येत आहे. सुजय हा निर्णय घेण्यास सक्षम आहे, युतीच्या नेत्यांचा त्याला पाठिंबा असल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या स्टार प्रचारकाने केल्याने एका जागेसाठी आघाडी धर्मपणास लागला गेल्याचे समोर येत आहे. डॉ सुजय यांनी आपले आई-वडील आपल्या प्रचारात येत नसल्याची खंत व्यक्त केली होती.राधाकृष्ण विखे यांचे वक्तव्य पाहता सुजय यांनी खंत व्यक्त करण्याचे आवश्यकतानसल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.