महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 13, 2019, 12:38 AM IST

ETV Bharat / state

विजय वडेट्टीवार यांनी वाढदिवसादिनी घेतले साई समाधीचे दर्शन

माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

vijay-vaddetiwar-prayed-in-sai-samadhi-temple
विजय वडेट्टीवारांनी वाढदिवसाच्या निम्मीताने घेतले साई समाधीचे दर्शन

अहमदनगर -माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी गुरुवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले होते. मात्र, राज्यसभेत त्यांनी वॉक आऊट केला. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला, असे म्हणता येणार नाही. याचा राज्यातील सरकारवर काही परिणाम होणार नाही. राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचे सोनिया गांधीनी सांगितले होते. त्यांनी जर सरकारमधून बाहेर पडा, असे सांगितले तर आम्ही बाहेर पडू, असेही वडेट्टीवार यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

हेही वाचा- मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार जाहीर

तीन विचारधारेचे सरकार आहे म्हणून, हे सरकार टिकणार नाही, असा अनेकांच्या मनात विचार आला. तो विचारच नष्ट व्हावा, हा आमचा उद्देश आहे. नागरिकत्व विधेयक लोकांच्या मुलभूत प्रश्नांपासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे. राज्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. देशातील जीडीपी कमी झाला यासाठी, सरकारने काय केले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

किमान समान कार्यक्रम जो राज्यात ठरला आहे, त्याच प्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. आज आरएसएसचे हिंदुत्व देशविघातक आहे. राज्यात 3 पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. खाते वाटपातही एकमत झाले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

हेही वाचा -अहमदनगरमध्ये गावकऱ्यांनी बंद पाडले निकृष्ठ रस्त्याचे काम

ABOUT THE AUTHOR

...view details