अहमदनगर - वंचित बहुजन आघाडीने आज अहमदनगरची उमेदवारी जाहीर केली. येथून माजी अधिकारी सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी - ELECTION
आव्हाड म्हणाले, की बहुजन समाजाला प्रकाश आंबेडकरांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. इतर सर्व पक्ष जातीयवादी आणि धनदांडग्यांच्या पाठीशी असताना प्रकाश आंबेडकरांनी सामान्य जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली.
सुधाकर आव्हाड हे पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी अनेक वर्षे सरकारी नोकरीत अधिकारी पदावर काम केले आहे. भारीप बहुजन महासंघ आणि एमआयएमने संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
आव्हाड म्हणाले, की बहुजन समाजाला प्रकाश आंबेडकरांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. इतर सर्व पक्ष जातीयवादी आणि धनदांडग्यांच्या पाठीशी असताना प्रकाश आंबेडकरांनी सामान्य जनतेसाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यामुळे आमच्या समोर कितीही मोठ्या शक्ती असल्या तरी जनता आम्हालाच साथ देईल. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, दिलीप साळवे, सुनील शिंदे, नितीन घोडके, जीवन कांबळे आदी उपस्थित होते.