अहमदनगर- केंद्रीय शहर विकास मंत्री मदन कौशिक यांनी त्यांच्या परिवारासह आज शिर्डीच्या साई मंदिराला भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी शहरातील स्वच्छतेचीही पाहणी केली. शिर्डीतील स्वच्छता पाहून त्यांनी साई संस्थान आणि नगरपंचायतीचे कौतुक केले आहे.
केंद्रीय शहर विकास मंत्री मदन कौशिक यांची परिवारासह शिर्डीच्या साई मंदिराला भेट
केंद्रीय शहर विकास मंत्री मदन कौशिक यांनी त्यांच्या परिवारासह आज शिर्डीच्या साई मंदिराला भेट दिली. शिर्डीतील स्वच्छता पाहून त्यांनी साई संस्थान आणि नगरपंचायतीचे कौतुक केले आहे.
शिर्डीला स्वच्छ भारत अभियानात देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. शिर्डी खरच इतकी स्वछता आहे का, हे पाहण्यासाठी मी येथे आलो असल्याचे मदन कौशिक यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर, साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येथे येत असतात. त्यानंतरही शिर्डीत मोठी स्वच्छता दिसून येते. ही स्वच्छता राखून ठेवण्याठी मदन कौशिक यांनी साई संस्थानाबरोबर नगरपंचायतीचे कौतुक केले आहे.
यावेळी साई संस्थानाच्या वतीने कौशिक कुटुंबीयांचा शाल व साई मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. शिर्डीतील स्वच्छता पाहून हरिद्वार येथेही याच प्रकारे स्वच्छता ठेवण्याचे प्रयत्न आपण करणार असल्याचे मदन कौशिक यांनी यावेळी सांगितले.