शिर्डी- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहपत्नीक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले असून साईबाबांच्या समाधी दर्शनानंतर साई संस्थानच्यावतीने ठाकरे यांचा साई मूर्ती, शाल देऊन सन्मान करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहपत्नीक साईचरणी - darshan
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे संगमनेरमध्ये
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे संगमनेरकडे रवाना झाले. माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असल्याने उद्धव ठाकरे सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Apr 22, 2019, 9:33 PM IST