महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू - terrace

नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. आई घरामध्ये स्वयंपाकाची कामे करत होती. त्याच वेळी ही मुले घराच्या गच्चीवर गेम खेळत असताना अनावधानाने विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. वायर मधील विजेच्या जोरदार प्रवाहाचा धक्का त्यांना बसला आणि ते दोघेही शेजारी असणाऱ्या घराच्या पत्र्यावर फेकले गेले.

गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

By

Published : May 28, 2019, 8:31 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील कर्जत शहरात गवंडी गल्ली येथे घराच्या गच्चीवर खेळत असताना दोघा लहान बहिण-भावाला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयर्न विनयकुमार निषाद (वय ७) व जानवी विनयकुमार निषाद (वय ३) अशी त्या मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात आणि शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच अनेक नागरिक उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे जमा झाले होते.

गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील आहे. विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ते उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात आले आहेत. रोज मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.

नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. आई घरामध्ये स्वयंपाकाची कामे करत होती. त्याच वेळी ही मुले घराच्या गच्चीवर गेम खेळत असताना अनावधानाने विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. वायर मधील विजेच्या जोरदार प्रवाहाचा धक्का त्यांना बसला आणि ते दोघेही शेजारी असणाऱ्या घराच्या पत्र्यावर फेकले गेले. ही घटना शेजारच्या काही जणांनी पाहिली. या नंतर दोघांनाही कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी जगताप यांनी हे दोघेही मृत असल्याचे जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details