महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात आज नवीन सहा कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णांची संख्या आता ६० वर - ahmednagar covid 19

आज (बुधवारी) सायंकाळी कोरोनाबाधित आढळलेल्या ५ व्यक्तीपैकी ३ व्यक्ती या काल (मंगळवारी) कोरोनाबाधित आढळलेल्या सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत. तर एक व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्शनीस्ट आहे.

ahmednagar corona update
अहमदनगर जिल्हा रुग्णालय

By

Published : May 13, 2020, 11:48 PM IST

अहमदनगर - शहरातील सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आज सायंकाळी पुन्हा आणखी पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिवसभरात एकूण ६ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे.

आज (बुधवारी) सायंकाळी कोरोनाबाधित आढळलेल्या ५ व्यक्तीपैकी ३ व्यक्ती या काल (मंगळवारी) कोरोनाबाधित आढळलेल्या सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत. तर एक व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्शनीस्ट आहे. आणखी एक व्यक्ती निघोज येथील असून, या व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक संपर्क टाळा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ५ अहवाल प्राप्त झाले. हे पाचही जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनाबाधित आढळलेली व्यक्ती ही चालक असून, त्याने पुणे-मुंबई प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला, अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मंगळवारी कोरोनाबाधित आढळलेल्या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या महिलेने ज्या खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनीस्टही बाधित आढळून आली.

दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details