अहमदनगर: शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी मिळणारा व्हीआयपी पासचा सुरु असलेला काळाबाजार रोखण्या बरोबरच, साईभक्तांना होणार त्रास कमी करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा व निर्णय घेण्यात आले आहे.
झटपट दर्शनाचा नावाखाली भाविकांची लूट:साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर, उत्सव काळात लाखो साईभक्त शिर्डीत येतात. साईबाबांचे झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्तांच्या फसवणुकीचे प्रकार देखील समोर आले आहेत. काही सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. साईबाबांचा आरतीपास घेण्यासाठी लागणारी शिफारस यामुळे भक्तांची लूट होत असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.
दलालांना चोप देवून: साई मंदिरात झटपट दर्शन करुन देणाऱ्या दलालांची देखिल यापुढे धुलाई करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. झटपट साई दर्शनाच्या नावाखाली हे दलाल भाविकांकडून मोठी माया घेवून त्यांची लुबाडणूक करतात. वेळ प्रसंगी त्यांना वेठीस धरतात अशा दलालांना चोप देवून पोलिसांच्या स्वाधिन केले जाणार असल्याचाही इशारा शिर्डी ग्रामस्थ गणेश कोते यांनी दिला. तसेचशिर्डी ग्रामस्थांना साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी तीन नंबर गेट सुरु आहे. ग्रामस्थांनी आपले आधार कार्ड दाखवून दर्शनासाठी या गेट मधुन प्रवेश दिला जाणार आहे. त्याच बरोबर ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही मंदिरात सोडले जाणार नाही.
कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदी: साईबाबांच्या मंदिरात तसेच मंदिर परिसरात साई संस्थांनचे प्रशासकीय अधिकारी यांचा मोबाईल घेवुन जाता येणार आहे. संस्थानच्या इतर कर्मचारी यांना मोबाईल बंदी घालण्यात आलेली असताना, देखील काही कर्मचारी मोबाईल घेवुन येत आहे. असे कोणीही आढळल्यास त्या कर्मचाऱ्यावरती ताबडतोब कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली आहे. तसेच साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी भाविकानासोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण ही दिले जाणार असल्याचही जाधव म्हणाले आहे.
त्याचबरोबर साईबाबांच्या आरतीसाठी व्हीआयपी पासेससाठी लागणारी शिफारस बंद करण्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून तदर्थ सदस्य समिती समोर मांडणार आहे. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तातडीने याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली आहे.
हेही वाचा: Shirdi Saibaba Temple शिर्डी साईबाबा मंदिरात हार फूल प्रसादावरील बंदी हटणार साई संस्थान समितीचा निर्णय