महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टरबूजांखाली दडवलेली सुगंधी तंबाखू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई - Ahmednagar Police

नगर शहरातील काटवन खंडोबा रोडवर मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. यात ९ हजार रुपयांच्या टरबुजांखाली ९ लाख ४५ हजार रुपयांची सुंगधी तंबाखू लपवण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई केली.

Aromatic tobacco
सुंगधी तंबाखू

By

Published : May 2, 2020, 8:58 AM IST

अहमदनगर -अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली टेम्पोतून टरबुजांखाली लपवून सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई केली. रमजान मन्सूर पठाण (वय २८, रा.संजयनगर,अ.नगर), अयाज इस्साक बागवान (वय ३९, रा.गाझीनगर, काटवान खंडोबा रोड, अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

टरबूजांखाली दडवलेली सुंगधी तंबाखू जप्त

नगर शहरातील काटवन खंडोबा रोडवर मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. यात ९ हजार रुपयांच्या टरबुजांखाली ९ लाख ४५ हजार रुपयांची सुंगधी तंबाखू लपवण्यात आली होती. ही तंबाखू औरंगाबाद येथील व्यापारी जुबेर याच्याकडून विकात आणल्याची माहिती आरोपींनी दिली. कॉन्सस्टेबल संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिलीप पवार, बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, सचिन आडबल, रविंद्र कर्डिले, संदिप दरंदले, रविंद्र घुंगासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details