महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये ३७९ कोरोनाबाधित वाढले; १४५१ जणांवर उपचार सुरू

रविवारी अहमदनगरमध्ये ३७९ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४४७ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४९५ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५१ जणांचा मृत्यू झाला असून १४५१ जणांवर उपचार सुरु आहेत. रविवारी दिवसभरात ४६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Ahmednagar corona update
अहमदनगर कोरोना अपडेट

By

Published : Jul 27, 2020, 7:43 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी ३७९ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटिजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत नोंदवण्यात आली.

३७९ रुग्णांची वाढ झाल्यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५१ इतकी झाली आहे. दिवसभरात तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४४७ वर पोहोचली असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

अँटिजेन चाचणीत श्रीरामपूर येथील ०५ जण बाधित आढळले. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २६५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२४, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०९ , नेवासा ०१, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी सकाळपर्यंत ६४ जण बाधित आढळून आले होते. त्यात अहमदनगर (2), संगमनेर (36),कर्जत(10), राहाता (12), राहुरी (4) अशा रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात आणखी ४५ रुग्णांची भर पडली.

सायंकाळी जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये आढळलेले कोरोनाबाधित

कर्जत(4) – राशीन (3), थेरवाडी (1),

अहमदनगर (2) – गुलमोहर रोड (1), अहमदनगर (1)

राहाता (5) – वाकडी (1), गणेश नगर (3), साकुरी (1),

श्रीगोंदा (3)- बनपिंप्री (1), काष्टी (2),

श्रीरामपुर (5)- रेल्वे कॉलनी (1), शहर(4).

संगमनेर (15) – अशोक चौक(1), पदमानगर (3), घुलेवाडी (7), सुकेवाडी (1), धांदरफळ (1), उमरी(1), निमोन(1),

अकोले (02) – वारुडी पठार(1), वाघापूर कोतुळ (1),

नेवासा (9) – जळका (1), भेंडा बु.(1),गळनिंब (2) करजगाव (5),

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती

उपचार सुरु असलेले रुग्ण: १४५१

बरे झालेले रुग्ण: १९४५

मृत्यू: ५१

एकूण रुग्ण संख्या:३४४७

दरम्यान, राज्यात रविवारी ९४३१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण संख्या आता ३७६७९९ अशी झाली आहे. दिवसभरात ६०४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण २१३२३८ रुग्ण बरे झाल्यामुळे दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १४८६०१ अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details