शिर्डी - येथील साई मंदिरात मंगळवारी किर्तनानंतर दहीहांडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. तिन दिवस शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. मंगळवारी रात्री साईबाबांची 10.30 वाजत आरती करण्यात आली. नेहमी उत्सवकाळातील मुख्य दिवशी साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते. मात्र, काल रात्री 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चंद्रग्रहण असल्याने साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
शिर्डीत दहीहंडी फोडून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
साई मंदिरात मंगळवारी किर्तनानंतर दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. तिन दिवस शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. मंगळवारी रात्री साईबाबांची 10.30 वाजत आरती करण्यात आली.
रात्री साई मंदिर बंद असल्याने पहाटे साईमूर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईबाबा संस्थानचे अध्यक्षांच्या हस्ते सपत्निक महारुद्राभिषेक करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवाचा सांगता दिवस असल्याने साईमंदिरात काल्याचे किर्तन पार पडले. काल्याच्या किर्तनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते. झिम्मा, फुगडी खेळून भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. किर्तनानंतर दहीहंडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पाडली आणि उत्सव समाप्त झाला. या तीन दिवसात 5 लाख भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहेत.