महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सराफ दुकान फोडून दागिने लंपास, तर बाजारातून पळवले महिलेचे गंठन; अहमदनगरमधील प्रकार - thief

कोल्हार ग्रामपंचायतीजवळ सोमनाथ अडाणी यांचे संजीवनी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानाचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. त्या तिघांनीही तोंडाला स्कार्फ बांधला होता. चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सकाळी दुकानात आल्यावर दुकान मालकाच्या लक्षात हा प्रकार आला.

महिलेचे दागिने चोरुन पोबारा करताना चोर

By

Published : Apr 1, 2019, 9:55 AM IST

अहमदनगर - सराफाचे बंद दुकान फोडून तीन अज्ञात चोरांनी दोन किलोंचे चांदीचे दागिने लंपाल केले आहेत. तर, आठवडी बाजारात दुचाकीवरुन आलेल्या चोरांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन पळवले. हे दोन्ही प्रकार राहाता तालुक्यातील कोल्हार येथे घडले आहेत. या प्रकारामुळे लोकात असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

सराफा दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले

कोल्हार ग्रामपंचायतीजवळ सोमनाथ अडाणी यांचे संजीवनी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानाचे कुलूप तोडून तीन अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. त्या तिघांनीही तोंडाला स्कार्फ बांधला होता. चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सकाळी दुकानात आल्यावर दुकान मालकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी जावून पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.


दुसऱ्या घटनेत आठवडी बाजारातून जात असताना एका महिलेच्या गळ्यातील ५ तोळ्यांचे गंठन दुचाकीस्वारांनी पळवले. स्वाती पोटे या दर्शनासाठी चारचाकी गाडीतून आल्या होत्या. गाडीतून उतरताच दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील दागिन्यावर डल्ला मारला. तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या या चोरांनी गर्दीचा फायदा घेऊन तेथून पोबारा केला. ही घटनादेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details