अहमदनगर - शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी केवळ ऑनलाइन पास सुविधा उपलब्ध असल्यामुळे ऑनलाइनची किचकट प्रणाली सर्व सामान्य भाविकांसाठी आता मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे पहायला मिळत आहे. साई दर्शनासाठी हजारो किलोमीटरवरून येऊन देखील अनेक भाविकांना साईबाबांचे दर्शन मिळत नाही. तसेच ऑनलाईन दर्शन पास प्रणालीत मोठ्याप्रमाणात काळाबाजार होत असल्याची तक्रार भाविकांकडून केला जात आहे. भाविकांच्या या समस्या ऐकुण घेण्यासाठी साई संस्थानच्या वतीने लवकर कोणी उपलब्ध होत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करत या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी फजिती कधी थांबवणार! शिर्डी साईबाबांचे मंदिर गेल्या 7 ऑक्टोबर पासुन भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर साई संस्थानकडुन केल्या गेलेल्या तयारीत दिवसाला दहा हजार ऑनलाईन आणि पाच हजार ऑफलाईन पासेस देवुन दर्शन देण्याचा ठरल होत आणि हे साई संस्थानने जाहीरही केल होत. मात्र त्या नंतर जिल्हाधिकार्या समवेत झालेल्या बैठकी नंतर काही तासाच्या आतच साई संस्थाने जाहीर केलेला निर्णय पुन्हा बदलण्यात येवून आता पंधरा हजार भाविकांना केवळ ऑनलाईन बुकींग करुनच दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि येथूनच भाविकांची साई दर्शनासाठी शिर्डीत गर्दी होण्यास सुरवात झाली आणि साई दर्शनासाठी लागणाऱ्या ऑनलाईन पासचा काळाबाजार सुरू झाला.
दर्शनासाठी भाविकांना अडचणी येत आहेत ऑनलाईन दर्शन पसासे घेवुन येणार्या भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय आणि ते दर्शन पासेस देण्याची साई संस्थानने शिर्डीत कोणतीही व्यवस्था न केल्याने काहींच फावल आणि मोफतचे पासेस देण्यासाठीही पैश्याची अव्वाच्या सव्वा आकरणी काहींनी शिर्डीत सुरु केली. त्यामुळे भाविकांची लुट सुरु झाली. त्यात शिर्डीत गर्दी झाल्यानंतर मोफतचे ऑनलाईन पासेसचा कोटा लवकर संपत असल्याने अनेक भाविकांना दर्शनासाठी पैसे मोजण्याची वेळ येवु लागलीय. देशातील काही धार्मिकस्थळी भाविकांना मोफत देवच दर्शन देत असतांना शिर्डीतच पैसे का घेतले जातायेत असा सवाल आता भाविक करू लागले असुन ऑनलाईन पासेचा काळाबाजार संस्थान का रोखत नाही असाही सवाल भाविकांनी उपस्थीत केला आहे. साईबाबांच्या साईदर्शनासाठी शिर्डीत दररोज हजारो भाविकांची गर्दी होते सुट्टीच्या दिवशी तर एक लाखाच्या आसपास शिर्डीत भाविक येतात. मात्र शिर्डीत येणार्या भाविकांचा समस्या एकुन घेण्याची व्यवस्थाच नसल्याने भाविकांना मोठी अडचन निर्माण होते आहे. दरम्यान काल साई दर्शनाचे ऑनलाईन सशुल्क पासेस काढण्यासाठी गेलेल्या अनेक भाविकांचा अकाऊंट मधुन दोनदा पैसे कट झाले. मात्र त्यांना दर्शनाचा पासच मिळाला नाही. अश्या भाविकांनी साई संस्थानशी संपर्क करुनही दाद मिळत नसल्याने पैसे कट झालेल्या भाविकांनी साई मंदीर परीसराच्या गेट नंबर चार जवळ जमा होत साई संस्थानला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांची त्यांची हमरीतुमरी झाली त्या नंतर तब्बल तीन तासांनी शिर्डी पोलीसांनी तेथे येवुन भाविकांच्या तक्रारी समजुन घेतल्या नंतर ज्या भाविकांचे पासे कट झालेले आहेत त्यांना दर्शनासाठी सोडण्यात आले.
साई संस्थानला पेमेंट गेट वे ची अडचण आल्याने पैसे कट होवुनही पासेस वितरण झाले नसल्याचा सांगितले आहे. दुसरीकडे ऑनलाईन पासेस काढतांनाचे अनेक घोळ समोर येतायेत एका भाविकांने सुरत येथुन पास काढला त्यावर त्याच्या फोटो एवजी साईबाबांचा फोटोच सायबर वाल्याने अपलोड केल्याने गोंधळ झाल्याच समोर आले आहे. यामुळे साई संस्थाने ऑनलाईन पासेस बरोबर ऑफलाईन पासेस सुरु करावेत तसेच आपली ऑनलाईन पासेस वितरण वेबसाईटही अद्यावत करण्याची आवशकता असल्याच दिसुन येते.