अहमदनगर -महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणाऱ्या पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे. मात्र याठिकाणी डोंगर अधिक असल्याने हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गुजरातला न जाता महाराष्ट्रात वळविले तर नाशिक अहमदनगरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण लढा देत आहोत. असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
...तर प्रांता-प्रांतातील वाद संपुष्टात येतील-
राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली आहे. या बैठकी दरम्यान छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जावू न देता हे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे पाणी आल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेण्याची गरज पडणार नाही. पाण्याचा साठा अधिक कसा वाढेल, यासाठी प्रयत्न केला तर प्रांता-प्रांतातील वाद संपुष्टात येतील. त्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात कालव्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध असून राहिलेली विकास कामे लवकर करण्यात येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी-
आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे. देशातून आणि जगातून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही. तोपर्यंत नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी. दिवाळी आनंदात साजरी करावी. मात्र या दिवाळीला जबाबदारीची किनार आहे. त्याचा नागरिकांनी विचार करावा, असे भुजबळ म्हणाले.
शासनाचे नागरिकांना वाचविण्यासाठी प्राधान्य-