अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्ताच्या गाडीची काच काही अज्ञात चोरट्यांनी फोडून गाडीतील ऐवज लंपास केला. यामध्ये दोन बॅगेमधील ४ मोबाईल तसेच ४ हजार रुपये रोख रक्कम आणि एटीएम कार्ड चोरून नेले आहे. ही घटना शिर्डीतील नगरपंचायत येथील कनकुरी रोडवर घडली.
साई भक्ताच्या गाडीची काच फोडून मोबाईलसह एटीएम कार्डची चोरी - bags
हैदराबाद येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्त परिवार आपली (एमएच २० ईजी ०११५) ही चारचाकी गाडी शिर्डी नगरपंचायतच्या मागील कनकुरी रोडवर पार्किंग करून साई दर्शनासाठी गेले होते.
हैदराबाद येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्त परिवार आपली (एमएच २० ईजी ०११५) ही चारचाकी गाडी शिर्डी नगरपंचायतच्या मागील कनकुरी रोडवर पार्किंग करून साई दर्शनासाठी गेले होते. कारचालक गाडी लॉक करून शौचालयासाठी गेला असल्याचे पाहून काही अज्ञात चोरट्यानी गाडीची मागील काच फोडून त्यातील दोन बॅग घेऊन पसार झाले. बॅगेमध्ये ४ मोबाईल तसेच ४ हजार रुपये आणि एटीएम कार्ड असल्याचे भाविक म्हणाले. भाविकांनी या संदर्भात शिर्डी पोलिसांना माहिती दिली आहे. यापूर्वी काही भाविकांच्या कारमधून मौल्यवान वस्तू याच ठिकाणावरून चोरीला गेल्याचे घटना घडले आहेत. आज पुन्हा एकदा याच ठिकाणी ही घटना घडल्याने शिर्डी पोलिसांना समोर आता मोठे आव्हानच आहे.