अहमदनगर - साईबाबा त्यांच्या खऱ्या भक्ताला दर्शन देतात. हा बाबांचा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य साईभक्तांनी केले. साईदर्शनाने आम्हाला खूप आनंद झाला आहे. बाबांचे दर्शन होणे ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे भाविकांनी सांगितले.
द्वारकामाईत झालेल्या साईदर्शनाने भाविक आनंदी....
साईबाबा त्यांच्या खऱ्या भक्ताला दर्शन देतात. हा बाबांचा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य साईभक्तांनी केले. साईदर्शनाने आम्हाला खूप आनंद झाला आहे. बाबांचे दर्शन होणे ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे भाविकांनी सांगितले.
द्वारकामाई मंदिराच्या भिंतिवर साईबाबांची प्रतिमा दिसून आल्याची माहिती भक्तांनी दिली. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यापूर्वीही 6 जानेवारी 2012 ला याच ठिकाणी भिंतिवर बाबांची प्रतिमा भाविकांना दिसली होती. त्यानंतर 12 एप्रिल 2018 या दिवशीही बाबांची प्रतिमा दिसली होती. आज पुन्हा तीसऱ्यांदा बाबांची प्रतिमा द्वारकामाई मंदिरात भिंतिवर दिसत असल्याने हा बाबांच्या मोठा साक्षात्कार मानला जात आहे.
याआधीही द्वारकमाई मंदिरात साईबाबांची प्रतिमा दिसली होती. त्यावेळी अनेकांनी हा साईंचा चमत्कार नसल्याचे म्हणत साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील फोटोवर लाईटचा प्रकाश पडत असल्याने रिफलेक्शन भिंतिवर दिसत असल्याचे म्हटले होते. आज पुन्हा एकदा बाबांची प्रतिमा भाविकांना दिसल्याने याला साईंचा चमत्कार म्हणायचे की अंधश्रद्धा हे पहणारे भाविकच ठरवतील.