महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रद्धा की अंधश्रद्धा: शिर्डीत भक्तांना पुन्हा दिसला साईबाबांचा चेहरा, भाविकांची गर्दी - nagar

सबका मालिक एकचा मंत्र देणाऱ्या साईबाबांचा द्वारकामाई मंदिरात पुन्हा चेहरा दिसू लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच भाविक मंदिराकडे येत आहेत. भक्तांनी मंदिरामध्ये साईनामाचा गजर सूरू केला आहे.

शिर्डीत भक्तांना पुन्हा दिसला साईबाबांचा चेहरा

By

Published : Jul 12, 2019, 11:48 AM IST

Updated : Jul 12, 2019, 12:21 PM IST

अहमदनगर - सबका मालिक एकचा मंत्र देणाऱ्या साईबाबांचा द्वारकामाई मंदिरात पुन्हा चेहरा दिसू लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच भाविक मंदिराकडे येत आहेत. भक्तांनी मंदिरामध्ये साईनामाचा गजर सूरू केला आहे. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत आहेत.

शिर्डीत भक्तांना पुन्हा दिसला साईबाबांचा चेहरा


आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारपासूनच भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी झाली आहे. साईबाबांची रात्रीची शेजआरती संपल्यानंतर भाविक तसेच साई संस्थानचे कर्मचारी आणि ग्रामस्थ साईबाबांच्या द्वाराकामाई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी दिल्ली येथील काही भाविकांना रात्री 11 वाजून 30 मिनटांनी पुन्हा एकदा व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा दिसत असल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी आणि भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी गर्दी नियंत्रणात अणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत असून, अनेकांनी सोशल मीडियावर सदर घटना व्हायरल केली असल्याने मध्यरात्रीपर्यंत भाविकांनी एकच गर्दी केली होती.

आपल्या हायातीत पाच घरं भिक्षा मागून पडक्या मंजीदमध्ये म्हणजेच द्वारकामाईत जीवन व्यतीत करणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत याच द्वारकामाई मंदिरातील भिंतीजवळ अनेक चमत्कार केले होते. यापूर्वीही 6 जानेवारी 2012 ला याच ठिकाणी भिंतिवर बाबांची प्रतिमा भाविकांना दिसली होती. त्यानंतर 12 एप्रिल 2018 रोजी दिसले होते. आज पुन्हा तीसऱ्यांदा बाबांची प्रतिमा द्वारकामाई मंदिरात भिंतिवर दिसत असल्याने हा बाबांचा मोठा साक्षात्कार मानला जात आहे.

याआधीही द्वारकमाई मंदिरात साईबाबांची प्रतिमा दिसली होती. त्यावेळी अनेकांनी हा साईंचा चमत्कार नसल्याचे म्हणत साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील फोटोवर लाईटचा प्रकाश पडत असल्याने रिफलेक्शन भिंतिवर दिसत असल्याचे म्हटले होते. आज पुन्हा एकदा बाबांची प्रतिमा भाविकांना दिसल्याने याला साईंचा चमत्कार म्हणायचे की अंधश्रद्धा हे पहणारे भाविकच ठरवतील.

Last Updated : Jul 12, 2019, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details