महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sai Baba: भक्ताने मंगळसूत्र मोडून 15 तोळ्यांचा सोन्याचा हार केला साईबाबांच्या चरणी अर्पण - Shirdi Saibaba Gold Necklace Donation

हैदराबाद येथील कल्याणी पोलवर्णम या महिला साईभक्तने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र मोडून तब्बल 15 तोळ्यांचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. या दागिन्याची किंमत साईबाबा संस्थानकडून 7 लाख 10 हजार सांगितली जात आहे.

भक्ताने मंगळसूत्र मोडून 15 तोळ्यांचा सोन्याचा हार केला साईबाबांच्या चरणी अर्पण
भक्ताने मंगळसूत्र मोडून 15 तोळ्यांचा सोन्याचा हार केला साईबाबांच्या चरणी अर्पण

By

Published : Oct 29, 2022, 5:18 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - हैदराबाद येथील एका साई भक्ताने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या मयत पत्नीची ईच्छा पूर्ण करण्यासाठी साईबाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला होता. तर आज शनिवार (दि. 29 ऑक्टोबर)रोजी हैदराबाद येथील कल्याणी पोलवर्णम या महिला साईभक्तने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र मोडून तब्बल 15 तोळ्यांचा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. या दागिन्याची किंमत साईबाबा संस्थानकडून 7 लाख 10 हजार सांगितली जात आहे.

साई बाबा मंदिर

मूळ हैदराबाद येथील रहिवासी असलेले पोलवर्णम हे पश्चिम बंगाल येथे वरीष्ठ आयएएस ऑफिसर होते. मात्र, कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या पत्नी कल्याणी पोलवर्णम यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे मंगलसूत्र मुलांना देण्याएवजी त्यांनी ते मोडून त्यात आणखीन पैशांची भर टाकत साईबाबांना तब्बल 15 तोळे सोनाचा 7 लाख 10 हजार रुपयांचा हार बनवला आहे. हा सोन्याचा हार त्यांनी आज साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details