महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Development Of Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी निधीची तरतुद संस्थाने केले निर्णयाचे स्वागत - अर्थमंत्री अजित पवार

विमानतळाच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी (provide funds for the development of Shirdi Airport) अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळासाठी 150 कोटीची तरतूद (150 crore for Shirdi Airport) करण्यात आली आहे. जगभरातून येणाऱ्या साईभक्तांसाठी आघाडी सरकारचा हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगत साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी या निर्णयाचे स्वागत (welcomed by the sansthan) केले आहे.

Shirdi Airport
शिर्डी विमानतळ

By

Published : Mar 13, 2022, 3:59 PM IST

शिर्डी : दुष्काळी भाग अशी ओळख असणाऱ्या कोपरगाव आणि राहाता तालुक्याच्या सीमेवरील काकडी व परिसरातील गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी काकडी येथे शिर्डी विमानतळ व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. विमानतळामुळे जगभरातील साई भक्तांची शिर्डी येथे दर्शनासाठी येण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर झालीच पण परिसराचा विकास होण्यास मोठी मदत झाली. काही वर्षापासून विमानतळ समस्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे साईभक्तांना त्रास सहन करावा लागत होता. विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ हि सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा बंद झाली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांच्याकडे काकडी विमानतळाच्या सोयी सुविधांसाठी निधी मिळावा याबाबत मागणी केली होती. त्या मागणीची अर्थमंत्र्यांनी दखल घेवून नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विमान तळाच्या सर्वांगिण विकासासाठी (provide funds for the development of Shirdi Airport) 150 कोटीची तरतूद केली (150 crore for Shirdi Airport) आहे. त्यामुळे विमानतळ समस्येतून बाहेर येण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात आली आहे. शिर्डीत भविष्यात परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने या निर्णयाचे महत्व खूप मोठे असून 150 कोटी रुपये निधी विमान तळाच्या विकासाच्या दृष्टीने परिसराचा देखील विकास होणार असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details