अहमदनगर- राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना बाधा झाल्याने गावातील सर्वांचीच तपासणी करण्यात येत आहे. यामुळे गल्लीतील सर्वच रस्ते प्रशासनाने पूर्णपणे बंद केले आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद करून सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.
जलसंधारणमंत्री गडाखांचे सोनई गाव कोरोनाच्या विळख्यात; एकाच कुटुंबात आढळले दहा बाधित - जलसंधारणमंत्री गडाखांचे सोनई गाव कोरोनाच्या विळख्यात
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, यांनी खबरादीराचा उपाय म्हणून गावात विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने 11 पथक कार्यरत केले असून, तपासणी करण्यासाठी 50 जण कार्यरत आहेत. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 102 लोकांची कोरोनाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व लोकांची धाकधुक वाढली आहे.
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, यांनी खबरादीराचा उपाय म्हणून गावात विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने 11 पथक कार्यरत केले असून, तपासणी करण्यासाठी 50 जण कार्यरत आहेत. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 102 लोकांची कोरोनाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व लोकांची धाकधुक वाढली आहे. संपूर्ण गावच हाॅटस्पाॅट झाल्याने जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांचे हाल होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.