अहमदनगर - शिर्डीतील तेलगु समाज संघटनेने शिर्डी विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. शहरातील साकुरी शिव येथील समर्थ हॉटेल येथे आयोजित सभेत संघटनेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली.
शिर्डीतील तेलगु समाज संघटनेचा राधाकृष्ण विखेंना पाठिंबा
आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांतील काही लोक आता शिर्डीतच स्थायिक झाले असल्याने त्यांची नावे मतदार यादीतही आली आहेत. यात चारशे मतदारही आहेत. या सर्व मतदारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा -'मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरतोय ते मात्र मंत्री असून गल्लीबोळात फिरतायत'
साईबाबांच्या शिर्डीत आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक प्रांतातुन लोक येतात. यात प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांतील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. यातील काही लोक आता शिर्डीतच स्थायिक झाले असल्याने त्यांची नावे मतदार यादीतही आली आहेत. शिर्डीत जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त तेलगु लोक राहतात. यात चारशे मतदारही आहेत. या सर्व मतदारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.