महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kalpanaraje Bhosale : छत्रपती शिवरायांबाबत बेताल व्यक्त करणे चुकीचे - कल्पनाराजे भोसले - कल्पना राजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले ( Kalpana Raje Bhosale ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करणे चुकीचे आहे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) असे त्या शिर्डीत म्हणाल्या.

Kalpana Raje Bhosale
कल्पनाराजे भोसले

By

Published : Dec 6, 2022, 8:04 PM IST

Updated : Dec 6, 2022, 9:56 PM IST

शिर्डी -छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांचे राज्य हे रयतेचे, जनतेचे होते. मात्र, आता वारंवार राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर केला जात आहे. त्यांच्याविषयी बेताल विधान केले जात आहे. हे चुकीचे सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुठलेही बेताल विधान होईला नको, असे छत्रपती उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले ( Kalpana Raje Bhosale ) यांनी शिर्डीत म्हटले आहे.

शिवराया बाबत बेताल व्यक्त करणे चुकीचे - कल्पनाराजे भोसले

शिर्डीत साई समाधीचे दर्शन -कल्पना राजे भोसले यांनी आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, मी खुप लहान असतांना साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यानंतर दोन तीन वेळा मी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. आज पुन्हा तब्बल 22 ते 25 वर्षांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येण्याचा योग आला. आज साईबाबांच्या आरतीलाही उपस्थिती राहण्याचे भाग्य मिळाल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.राजे भोसले ( Kalpana Raje Bhosale ) शिर्डीत म्हटलय.

बेताल विधान व्हायला नको - साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला खुप समाधान मिळले असल्याचे यावेळी भोसले म्हणाल्या. त्याच बरोबर राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा राजकारणासाठी वारंवार वापर केला जात आहे. हे चुकीचे असुन त्यांच्या विषय बेताल व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषय कुठलेही बेताल व्यक्त होईला नको असे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पना राजे भोसले म्हणाल्या.

उदयनराजे यांच्यासाठी मातोश्रीने घेतले साईबाबांचे लॉकेट -छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पना राजे भोसले यांनी आज शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. कल्पना राजे भोसले यांनी आज साईबाबांच्या माध्यन्ह आरतीला ही हजेरी लावलीय. साईबाबांच्या आरतीनंतर भोसले यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूरही छोटी आरती तसेच साईबाबांच्या पाद्यपूजा केली आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर निलेश कोते यांनी भोसले यांच्या शॉल साईबाबांची मूर्ती , साईबाबांची प्रतिमा देवुन सन्मान केलाय. साई मंदिरा बाहेरील दुकानातून छत्रपती उदयनराजे यांच्यासाठी गळ्यातील साईबाबांचे लॉकेटही खरेदी केले आहे. मात्र, यावेळी भोसले यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दर्शविला आहे.


कोते कुटुंबियांचे केले सांत्वना - साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते तसेच बाईजाबाई कोते यांचे वंशज मुकुंदराव ( अण्णा ) कोते यांचे गेल्या काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले आहे. आज कल्पना राजे भोसले यांनी शिर्डीत येऊन कोते कुटुंबीयांची घरी जावुन भेट घेत त्यांचे सांत्वना केले आहे. कल्पना राजे भोसले यांनी तब्बल एक तास कोते कुटुंबियांच्या घरी बसुन मयत मुकुंदराव ( अण्णा ) कोते यांचे चिरंजीव मिलिंद कोते निलेश कोते तसेच मातोश्री यांच्याशी चर्चा केली. त्याच बरोबर कोते यांच्या घरातील साईबाबांच्या मंदिरा समोर बसुन ध्यानही भोसले यांनी केले आहे.

Last Updated : Dec 6, 2022, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details