अहमदनगर - वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 68 हजारांची लाच मागून त्यातील 28 हजार रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि 29 मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील तालाठ्याला रंगेहाथ पकडले आहे. सुशीलराजेंद्र शुक्ला (वय 33 वर्षे), असे त्या लाचखोर तालाठ्याचे नाव आहे.
कोपरगावात 28 हजारांची लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - अहमदनगर शहर बातमी
वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 68 हजारांची लाच मागून त्यातील 28 हजार रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी धोत्रे येथील तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला याने 68 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील 28 हजारांची रक्कम स्वीकारताना त्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोपरगाव शहरातील जुन्या टाकळी रोडवर चारचाकीमध्ये रंगेहाथ पकडले. याबाबत रविवारी (दि. 30 मे) आरोपी सुशील राजेंद्र शुक्ला याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -राहाता येथे फेरफार निर्गत करण्यासाठी शिबिर, सोमवारपासून आयोजन