अहमदनगर- भाजपकडे कोणती तरी वाशिंग पावडर आहे. ज्यामुळे आमच्या पक्षात असताना आरोपी असलेले लोक भाजप-सेनेकडे गेले की धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ होतात, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप-सेनेच्या इनकमिंगवर लगावला आहे.
भाजपकडील पावडरने पक्षांतर केलेले नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात; खासदार सुळेंची टीका - खासदार सुप्रिया सुळे
भाजपकडे कोणती तरी वाशिंग पावडर आहे. ज्यामुळे आमच्या पक्षात असताना आरोपी असलेले लोक भाजप-सेनेकडे गेले की धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ होतात, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप-सेनेच्या इनकमिंगवर लगावला आहे.
अहमदनगरमध्ये संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते ईडी, सीबीआय, कारखान्यांचे कर्ज, अशा चार-पाच कारणांमुळे भाजप-सेनेत जात आहेत. मात्र, आम्हाला जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येणारे सरकार आघाडीचे असो किंवा युतीचे त्यात कॅबिनेट आमचेच असणार असल्याचा अजब दावा केला आहे.
त्यांनी आपण कधीकाळी पवार साहेबांजवळ असणाऱ्या नेत्यांबद्दल बोलणार नसल्याचेही खा. सुळे यांनी सांगितले. मात्र, पिचडांसारखे नेते दूर गेल्याबद्दल दुःख होणे साहजीकच असल्याचेही त्या म्हणाल्या. विचारसरणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, सध्या होणारे पक्षांतर पाहता ही संस्कृती कुठे गेली असा प्रश्न पडत असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.