मुंबई- अहमदनगरच्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. त्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार राम कदम, आमदार कर्डीले आदि भाजप नेते उपस्थित होते.
विखे म्हणाले, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि कर्तृत्व पाहून मी आणि माझ्यासोबतच्या युवकांनी भाजपमध्ये येणाचा निर्णय घेतला. माझ्या संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला आधार दिला. त्यामुळे नगर जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्याचा शब्द देत असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले.