महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

त्या दिवशी 'त्यांचे' दुकान बंद करेन; मुनगंटीवारांचा सेनेला टोला - सुधीर मुनगंटीवार शिर्डीमध्ये

बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की, ज्या दिवशी आम्ही काँग्रेसबरोबर जाऊ. त्या दिवशी मी शिवसेनेच दुकान बंद करेल. मी शिर्डीच्या पावन भूमीत साईचरणी अशीच प्रार्थना करेल, असे भाजपचे जेष्ठनेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar in Shirdi) शिर्डीत वक्तव्य केले.

Sudhir mungantiwar
Sudhir mungantiwar

By

Published : Apr 25, 2022, 7:26 AM IST

अहमदनगर :कधी कधी असे वाटते की संजय राऊतांचाच शिवसेनेवर राग असेल शिवसेना संपविण्याचा विडा त्यांनी उचलला असेल. काँग्रेस विसरर्जित करावी हे महात्मा गांधीच स्वप्न होत. कोणत्याही नेत्यांनी तो संकल्प पूर्ण केला नव्हता. मात्र, राहुल गांधींनी तो संकल्प केला असल्याची टीका भाजपचे जेष्ठनेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुनगंटीवारांचा सेनेला टोला
बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की, ज्या दिवशी आम्ही काँग्रेसबरोबर जाऊ. त्या दिवशी मी शिवसेनेच दुकान बंद करेल. साहेबांचे स्वप्न कदाचित त्यांना पूर्ण करायच असेल. मी शिर्डीच्या पावन भूमीत साईचरणी अशीच प्रार्थना करेल. स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट यांचा काँग्रेसबरोबर गेल्या नंतर शिवसेनेच दुकान बंद करण्याच जे स्वप्न होत ते यांच्या हातून पूर्ण होवो, असे भाजपचे जेष्ठनेते सुधीर मुनगंटीवार शिर्डीत म्हणाले आहे.
मुनगंटीवार शिर्डीमध्ये

हनुमान चालीसा पठण राजद्रोहाचा गुन्हा
वंदे मातरमला विरोध करणे भारत मातेच्या संदर्भात अपशब्द वापरणे देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात अपशब्द वापरणे हे या देशात राजद्रोहाचे गुन्हे नाहीत. मात्र आपल्या राज्यात हनुमान चालीसाच पठण करणे हा राजद्रोहाचा गुन्हा आहे. यांची हिंदुत्ववादी भूमिका कशी बेगडी आहे. हे या उदाहरणावरुन दिसते. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हणणार असाल तर हे या देशातील सर्वात अपवित्र कार्य आहे. मात्र, भारतमाता की जय न म्हणणारे हे तर मामडीवर बसले पाहिजेत. यांच्याच मतावर आपल सत्तेच दुकान चालते. आमच्या परिवारात पात्रता, योग्यता नसताना मोठ्या मोठ्या पदावर जाता येते. म्हणून ज्यांना वाईट कृती करायची, आमचा न्यायालयावर विश्वास आहे, राणा यांना जामीन मिळेल असल्याचे भाजपचे जेष्ठनेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे.
हेही वाचा -Rana Couple Recite Hanuman Chalisa : राणा दाम्पत्याकडून कोठडीत 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण

ABOUT THE AUTHOR

...view details