महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमपीएससी परीक्षा रद्द : नगरमध्ये विद्यार्थ्यांचा संताप, भाजपसह काँग्रेसही आंदोलनात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा रद्द केल्याची माहिती धडकताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये एकच संताप पसरला आणि विद्यार्थी शहरातील दिल्लीगेट परिसरात मोठ्या संख्येने एकत्र येत रस्त्यावर उतरले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार आणि लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाविरोधात घोषणा देत शहरातून रॅली काढली.

ahmednagr
नगरमध्ये विद्यार्थ्यांचा संताप

By

Published : Mar 12, 2021, 7:33 AM IST

Updated : Mar 12, 2021, 7:50 AM IST

अहमदनगर- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन दिवसावर आलेल्या परीक्षा कोरोना प्रादूर्भावाचे कारण देऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात या निर्णयाविरोधात निषेध आंदोलने केले. अहमदनगरमध्येही आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात विरोधी पक्ष भाजपसह सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

एमपीएससी परीक्षा रद्द
विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त आंदोलन, पोलीस हतबल-


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा रद्द केल्याची माहिती धडकताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये एकच संताप पसरला आणि विद्यार्थी शहरातील दिल्लीगेट परिसरात मोठ्या संख्येने एकत्र येत रस्त्यावर उतरले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार आणि लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाविरोधात घोषणा देत शहरातून रॅली काढली. दिल्लीगेट परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त वाढवला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला काढले. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पोलिसांकडे कसलेही उत्तर नव्हते.

काँग्रेसची सबुरी मात्र भाजप आक्रमक, विद्यार्थी ताब्यात-

परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरताच सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नेतृत्व करत आंदोलन सुरू केले. विद्यार्थी रस्त्यावर येताच पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटवले, मात्र त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या वतीने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले. विद्यार्थी पोलिसांचे ऐकत नसल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड करत त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात आणले, तिथे प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. भाजप युवा मोर्च्याने सरकारच्या परीक्षा अचानक रद्द करण्याचा आणि पोलीस कारवाईचा निषेध केला आहे.

Last Updated : Mar 12, 2021, 7:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details