शिर्डी - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज खातेवाटप झाले. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यांच्याकडे आता नगरविकास राज्यमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा राहुरी तालुक्यातील कोल्हार येथे नागरी सत्कार करण्यात आला.
'मी मंत्री झाल्याचा आनंद माझ्या पेक्षा राहुरीकरांनाच जास्त' - rahuri
मंत्री झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा राहुरी तालुक्यातील जनतेला अधिक झाला आहे. पक्ष नेतृत्वाने आमचे शिक्षण अनुभव पाहुन खाते वाटप केले. मला जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी पार पाडताना समाजाच्या शेवटच्या घटकांना केंद्रबिंदू मानून शेवटच्या घटकांना न्याय देण्याची भूमिका राहील.
मंत्री तनपुरे म्हणाले, मंत्री झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा राहुरी तालुक्यातील जनतेला अधिक झाला आहे. पक्ष नेतृत्वाने आमचे शिक्षण अनुभव पाहुन खाते वाटप केले. मला जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी पार पाडताना समाज्याच्या शेवटच्या घटकांना केंद्र बिंदू मानून शेवटच्या घटकांना न्याय देण्याची भूमिका राहिल. तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती मी राबवणार असल्याची प्रतिक्रिया तनपुरे यांनी दिली आहे.
राहुरी तालुक्याला गेल्या अनेक वर्षानंतर मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे मी मंत्री झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा राहुरी तालुक्यातील जनतेला जास्त झाला असल्याचेही तनपुरे म्हणाले.