महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शिवाजी कर्डिलेंना उमेदवारी देऊ नका'

जिल्ह्यातील निर्ढावलेला गुन्हेगार, कायद्याला कस्पटासमान समजणारे आमदार शिवाजी कर्डिले यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोडून द्यावे. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट देऊ नये, अशी सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

पत्रकार परिषद

By

Published : Sep 11, 2019, 8:30 PM IST

अहमदनगर- भारतीय जनता पक्षाचे राहुरी-नगरचे आमदार शिवाजी कर्डिले हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना आणि त्यांच्या नात्यातील इतरांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील समाजसेवक शंकर राऊत, मिलिंद मोभरकर आणि अमोल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.

माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते

जिल्ह्यातील निर्ढावलेला गुन्हेगार, कायद्याला कस्पटासमान समजणारे आमदार शिवाजी कर्डिले यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोडून द्यावे. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट देऊ नये, अशी सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १३ आणि १४ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यात येत असून, राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन मिलिंद मोभरकर आणि अमोल जाधव, शंकर राऊत यांनी ही मागणी केली आहे.

कर्डिले यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही ते पक्षाचे आमदार आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून आपला आमदार कसा निर्दोष सुटेल याची काळजी घेतल्याचा आरोप, यावेळी करण्यात आला. जर राहुरी मतदारसंघातून कर्डिले यांना उमेदवारी दिली गेली, तर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा-श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळेंच्या विरोधात बॅनरबाजी

आमदार कर्डिले यांचे नातेवाईक, जावई जगताप-कोतकर कुटुंबालासुद्धा पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कर्डिले, जगताप, खोतकर ही कुटुंबे विविध पक्षात असली तरी त्यांची संघटितपणे गुन्हेगारी आहे. याचा विचार राजकीय पक्षांनी आणि जनतेने करून त्यांना नाकारावे, असे यावेळी सांगण्यात आले. राऊत, मोबारकर, जाधव हे सामाजिक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून आमदार कर्डिले आदी विरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details