अहमदनगर - पोलीस ठाण्यात अचानक साप आल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर साप सापडला आणि तो सर्पमित्रांनी पकडला. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.
सापाच्या मागावर होते पोलीस पथक; सर्पमित्राच्या मदतीने केले जेरबंद - अहमदनगर
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात गुरुवारी रात्री एक साप दिसला. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली, त्यांनी सर्पमित्राला बोलावून घेतले. तब्ब्ल एक तासाच्या प्रयत्नानंतर साप ठाण्याच्या आवारात पडलेल्या पाईपच्या फुटबॉलमध्ये लपलेल्या सापाला सर्पमित्रांनी पकडले.
घारगाव पोलीस ठाण्याचे नियमित कामकाज सुरू असताना गुरुवारी रात्री अचानक पोलीस ठाण्याच्या आवारात साप दिसला. पोलीस ठाण्यात साप दिसतात पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. आणि थोड्याच वेळात तो साप दिसेनासे झाला. रात्रीची वेळ असल्याने अंधारात साप नेमका कुठे लपला, याचा थांगपत्ताच लागेना. रात्री पुन्हा अचानक बाहेर येऊन काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही सर्पमित्रांना बोलावून घेतले. सर्पमित्रांनी साप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. बराच वेळ पोलिसांकडून सापाचा शोध सुरू होता. तब्बल एक तासानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात पडलेल्या पाईपच्या फुटबॉलमध्ये साप दिसला. सर्पमित्रांनी त्याला अलगद पकडले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
तब्बल एक तास पोलीस ठाण्यात सापाची शोधाशोध होती. त्यामुळे अनेक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. साप सर्पमित्रांच्या हाती लागताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.