अहमदनगर- कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील 8 गावांना पुराने वेढा दिला आहे. भीमा नदी पात्रातून 2 लाख 21 हजार इतक्या क्यूसेसने पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने अष्टविनायक येथील गणपती सिद्धटेककडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कर्जत आणि दौंड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.
भीमेच्या पुराचा आठ गावांना वेढा; पालकमंत्री प्रा. राम शिंदेंनी केली पाहणी - flood of Bhima
भीमा नदी पात्रातून 2 लाख 21 हजार इतक्या क्यूसेसने पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने अष्टविनायक येथील गणपती सिद्धटेककडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कर्जत आणि दौंड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.
गावांचा संपर्क तुटला
पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच पूरग्रस्त भागातील लोकांना आवश्यक असलेली मदत तत्काळ देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. जलालपूर, सिद्धटेक, भांबोरा, शिपोरा, बाभळगाव दुमाला व दूधोंडी आदी गावांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली.