अहमदनगर – शिवसेना उपनेते, माजी मंत्री व माजी आमदार अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अनिल राठोड यांना काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज पहाटे निधन झाले.
अनिल राठोड यांना काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे.
अनिल राठोड हे ‘भैय्या’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध होत. राठोड हे सलग पाच वेळा नगर शहर मतदारसंघाचे आमदार व काही काळ मंत्री देखील होते. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने नगरच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.