शिर्डी- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्यांच्या उमेदवारीला श्रीरामपूर मतदारसंघातील अनेक शिवसेना शाखाप्रमुख विरोध करत आहेत.
भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध हेही वाचा - सुप्रियांच्या पहिल्या निवडणुकीतील मदतीची राष्ट्रवादीकडून 'अशी' होणार सेनेला परतफेड?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कांबळे काँग्रेसकडून उमेदवार होते आणि सदाशिव लोखंडेंचा प्रचार करताना कांबळेंचा निष्क्रीयपणा मतदारांच्या समोर मांडला असून आता पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कोणत्या तोंडांनी मते मागायची हा प्रश्न आता उभा रहिला आहे. तसेच कांबळेंना उमदवारी न देण्याची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील 48 शिवसेना शाखाप्रमुख मागणी करत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 48 शाखाप्रमुखांनी पत्रे पाठवून कांबळेंना शिवसेनेकड़ून उमेदवारी न देण्याची मागणी केली आहेत.
हेही वाचा - लातूरकरांच्या आठवणीतली 'मामुली' निवडणूक; विलासरावांनाही पत्करावा लागला होता पराभव
भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मोठ्या प्रमाणात कांबळे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विरोध होताना पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर मतदारसंघात कांबळे यांच्या विरोधात पोष्टरबाजी करण्यात आली होती. तर, आता थेट स्थानिक शिवसेना पदाधिकाऱाांनी कांबळेंच्या उमेदवारीला विरोध करताना दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी नवीन उमेदवार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कांबळेना उमेदवारी दिली तर आम्ही पदाचा राजीनामा देणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
श्रीरामपूर मतदारसंघातून दिवसेंदिवस कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसून येत असून शिवसेना पक्षप्रमुख आता कांबळे यांना उमेदवारी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.