अहमदनगर - कोरोनाचा संभाव्य फैलाव टाळण्यासाठी शिर्डी साईबाबा संस्थानने उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. दक्षता म्हणुन शुक्रवारपासुन बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्थेत बोटाचे ठसे घेण्याचे बंद केले़ आहे. याच बरोबरीने कर्मचायांची बायोमेट्रिक हजेरीही बंद करण्यात आली आहे. मंदीरात भक्तांना लावला जाणारा गंध आता चंदनाच्या काडीने लावला जात आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी रोज सरासरी 50 हजारांवर आणि जास्तीत जास्त लाखांवर भाविक येत असतात. गेल्या तेरा दिवसांची आकडेवारी बघितली तर साधारण चाडे चार लाख भाविकांनी शिर्डीच्या साई मंदीरात येवुन दर्शन घेतले आहे. यावर्षी कोरोनाची भीती असतानाही गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गेल्या तेरा दिवसात तब्बल 10 हजार अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यामुळे भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिने साई संस्थान प्रशासनाने अनेक उपाय केले आहेत.
हेही वाचा -जगभरात कोरोनाचे थैमान; मात्र, शिर्डीत भाविकांनी लुटला रंगपंचमीचा आनंद