महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत सोमवारपासून चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

सोमवारी सकाळपासून साईंच्या चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरूवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईप्रतीमा, वीणा आणि साईसतचरित्राची साई समाधी मंदिर ते व्दारकामाई पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

शिर्डी

By

Published : Oct 7, 2019, 3:53 PM IST

अहमदनगर - शिर्डीत साईंच्या पुण्यतिथी उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. हा उत्सव चार दिवस चालणार आहे. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी ०८ ऑक्‍टोबरला भाविकांची गर्दी लक्षात घेता समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.

साईबाबांच्या शिर्डीतील पुण्यतिथी उत्सवाला सोमवारी भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईप्रतीमा, वीणा आणि साईसतचरित्राची साई समाधी मंदिर ते व्दारकामाई पर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. नंतर द्वारकामाई मंदिरात अखंड पारायणाच पठण करण्यात येऊन उत्सवाची सुरुवात करण्यात आली. मिरवणूक पुन्हा साईमंदिरात आल्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आले. मंगलस्नानानंतर साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते साईंची पाद्यपुजा करण्यात आली. साईंच्या मूर्तीला आज (सोमवारी) सोन्याच्या अलंकाराने सजवण्यात आले आहे. या उत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत.

हेही वाचा - साईबाबांच्या चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला उद्यापासून सुरूवात

हा उत्सव ४ दिवस चालणार असून मुंबई येथील व्दारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने उभारलेले भव्य प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे. ब्रम्हांडनायक यांच्या देखाव्यावर साकारण्यात आली असून साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने नटवण्यात आले आहे. तर, उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळे लाखो भाविकांची मांदीयाळी शिर्डीत पहावयास मिळणार आहे.

हेही वाचा - राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध

साईबाबांनी 15 अॉक्टोबर 1918 रोजी आपला मानवी देह ठेवला तेव्हापासुन शिर्डीत साईभक्त दसरा उत्सव साजरा करतात. यावर्षीचा हा 101 वा पुण्यतीथी उत्सव आहे. तर, उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थान मंदीर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानातर्फे घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थानने उत्सवाच्या पार्श्वभुमीवर भाविकांच्या सोयी सुविधेसाठी जय्यत तयारी केली असून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

हेही वाचा - राधाकृष्ण विखे-पाटलांची उमेदवारी अडचणीत; अर्जावर काँग्रेस उमेदवाराचा आक्षेप

ABOUT THE AUTHOR

...view details