अहमदनगर -साईबाबांच्या समाधी दर्शनाकरता देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातून भाविक शिर्डी येथे येतात. दररोज ५० ते ६० हजार भाविक या देवस्थानाला भेट देतात. उत्सव आणि सुट्ट्यांच्या कालावधित ही संख्या एक लाखाहून जास्त असते. या बाबीची दखल घेवून लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने साईबाबा समाधी मंदिराची भारतातील सर्वांत जास्त लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक म्हणून नोंद केली.
शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिराची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये नोंद - साईबाबा मंदिराची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये
शिर्डी संस्थानला दररोज ५० ते ६० हजार भाविक या देवस्थानाला भेट देतात. उत्सव आणि सुट्ट्यांच्या कालावधित ही संख्या एक लाखाहून जास्त असते. या बाबीची दखल घेवून लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने साईबाबा समाधी मंदिराची भारतातील सर्वांत जास्त लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक म्हणून नोंद केली.
या बाबतचे पत्र देवस्थान समितीला मिळाले आहे. या पत्रात म्हटले आहे की, 'आपल्याला कळवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडनच्या समितीने श्री साईबाबा समाधी मंदिराची (महाराष्ट्र) भारतातील सर्वाधिक भेट दिल्या गेलेल्या मंदिरांपैकी एक अशी नोंद केली आहे. ही एक धर्मनिरपेक्ष जागा असून येथे सर्व-धर्म-समभाव आहे'.
हेही वाचा - पर्यावरणाचा समतोल राखूनच विकास व्हावा, आरेच्या निर्णायाबद्दल उद्धव ठाकरेंचे अभिनंदन - सुप्रिया सुळे
लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे अधिकारी शिर्डीला येवून हे नोंदणीपत्र संस्थानला बहाल करणार असल्याची माहिती, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.