महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरमध्ये शोष खड्डा साफ करण्यासाठी गेलेल्या मजुराचा गुदमरुन मुत्यू, तर दुसरा जखमी

शोष खड्डा साफ करण्यासाठी गेलेल्या मजुराचा गुदमरुन मुत्यू झाला आहे, तर त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या वर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शोष खड्ड्याचे छायाचित्र

By

Published : Jul 12, 2019, 3:42 PM IST

अहमदनगर- शोष खड्डा साफ करण्यासाठी गेलेल्या मजुराचा गुदमरुन मुत्यू झाला आहे, तर त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या वर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

घटनेबद्दल माहिती सांगताना पोलीस पाटील

ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे (वय ३५) हे श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील सुखदेव पुंजा पुजारी यांच्या वस्तीवर सकाळी १० वाजेच्या सुमारास शौचालयाचा शोष खड्डा साफ करण्याकरिता गेले होते. शोष खड्डा साफ करण्यासाठी ते टाकीत उतरले. यावेळी टाकीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ज्ञानेश्वर गांगुर्डे याचा टाकीत गुदमरून मृत्यू झाला. तर त्यांना वाचविण्याकरिता गेलेल्या रवी राजू बागडे (वय ३५) जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील ओगले रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत ज्ञानेश्वरला तीन लहान मुले असून मोल मजुरी करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ वक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details