महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गळ्यात कांद्याच्या माळा.. मूठभर कापूस जाळा' आंदोलन : शेतकरी संघटना आक्रमक - शेतकरी संघटना आक्रमक

शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. शुक्रवारी राज्यभर शेतकर्‍यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापूस जाळण्याचे आंदोलन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

cotton weave movement
मूठभर कापूस जाळा आंदोलन

By

Published : May 23, 2020, 12:50 PM IST

अहमदनगर - कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई तसेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. शुक्रवारी राज्यभर शेतकर्‍यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापूस जाळण्याचे आंदोलन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

मूठभर कापूस जाळा आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरू केली असली तरी ती अत्यंत धिम्या गतीने आहे. सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरू करावी, अशा मागण्या शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.

केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकर्‍यांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा व कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या भावना व नाराजी सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details