महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक.. शेतकरी पती-पत्नीची झोपेत असतानाच डोक्यात फावडे घालून हत्या - क्राईम न्यूज

राहता तालुक्यातील कोर्हाळे येथे पती-पत्नीच्या डोक्यात फावडे घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. शशिकांत श्रीधर चांगले (60 वर्षे) आणि सिंधुबाई शशिकांत चांगले (55 वर्षे) अशी हत्या झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. त्यांना प्रवीण आणि प्रमोद ही दोन मुलं आहेत. या घटनेने तालुका हादरला आहे.

राहता
राहता

By

Published : Jun 26, 2021, 5:34 PM IST

राहता - अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोर्हाळे येथे धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे तालुका हादरला आहे. येथे शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीच्या डोक्यात फावडे घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शशिकांत श्रीधर चांगले (60 वर्षे) आणि सिंधुबाई शशिकांत चांगले (50 वर्षे) अशी हत्या झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. त्यांना प्रवीण आणि प्रमोद ही दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुलं व्यवसायानिमित्ताने राहाता येथे राहतात.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे

एक दिवसापूर्वीच भेटले आपल्या मुलांना

शुक्रवारीच शशिकांत आणि सिंधुबाई आपल्या दोन्ही मुलांना राहाता येथे भेटून घरी आले होते. सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे पती-पत्नी आज लवकर का उठले नाहीत? म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावले. तर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शेजाऱ्यांना दिसले. या घटनेची माहिती स्थानिकांनी राहाता पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक, श्वान पथक दाखल

श्रीरामपूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, शिर्डी पोलीस उपाअधिकारी संजय सातव, अहमदनगर एलसीबीचे अधिकारी अनिल कटके यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. अहमदनगर येथून फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

झोपेत फावड्याने वार करून हत्या?

पती-पत्नी रात्री झोपेत असतानाच डोक्यात फावड्याने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमागचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिपाली काळे यांनी सांगीतले आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरु असल्याचीही माहिती दिपाली काळे यांनी दिली आहे.

हेही वाचा -अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत फसवणूक

ABOUT THE AUTHOR

...view details