अहमदनगर - विविध आदर्श उपक्रम राबवून केवळ राज्यातच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहचलेल्या आदर्शगाव हिवरे बाजार कोरोनामुक्त झाल्याने 15 जूनपासून माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेत शाळा सुरू केली आहे. कोरोना काळात राज्यातील सर्व शाळा बंद असताना हिवरे बाजारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे राज्यभर कौतुक झाले. प्रसारमाध्यमांनी याकडे सकारात्मक पाहत कोरोनाची सावधानता पाळत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याची नांदी असून कोरोनासोबत जगताना ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
याबाबत शालेय शिक्षण विभागात गेल्या दोन-तीन दिवसात वेगळेच पडघम वाजल्याचे समोर येत आहे. राज्यातील इतर सर्व शाळा बंद असताना हिवरे बाजार येथिल शाळा कशी सुरू झाली याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाकडून विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची जोड देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी हिवरे बाजारचे सरपंच आणि राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी संपर्क केला. त्यावर हिवरे बाजारला पालक, शिक्षण अधिकारी आणि पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकांनी शाळा सुरूच राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.
पालकांच्या आग्रहापुढे शिक्षण विभाग नमले