सिनेअभिनेता संजय दत्त साई चरणी; चाहत्यांची गर्दी - साई संस्थान
सिनेअभिनेता संजय दत्तने शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी साई मंदिरात संजय दत्तचा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी शॉल आणि साईची मूर्ती भेट देवून सत्कार केला.
संजय दत्तने साई बाबांचे दर्शन घेतले
अहमदनगर - सिनेअभिनेता संजय दत्तने गुरुवारी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. संजय दत्त शिर्डीत येणार असल्याची वार्ता पसरल्याने मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. साई मंदिरात संजय दत्तचा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी शॉल आणि साईची मूर्ती भेट देवूनसत्कार केला. साई मंदिरातून बाहेर आल्या नंतर चाहत्यांच्या गराड्यात आणि धक्काबुकीत संजयला आपल्या वाहनापर्यंत पोहोचावे लागले.