महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी सामान्य जनतेचा उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ - संग्राम जगताप

मी सामान्य जनतेचा उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केले. नगर दक्षिण लोकसभेची निवडणुक ही एकतर्फी होणार असल्याचेही जगताप म्हणाले.

आमदार संग्राम जगताप

By

Published : Mar 20, 2019, 10:02 PM IST

अहमदनगर - मी सामान्य जनतेचा उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केले. नगर दक्षिण लोकसभेची निवडणुक ही एकतर्फी होणार असल्याचेही जगताप म्हणाले. लोकसभेचे तिकिट जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांच्यांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते.

दक्षिण नगरची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक समजली जात आहेच या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी मिळण्याची शक्याता आहे. त्यामुळे सुजय विरुद्ध संग्राम असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माझा विजय निश्चित- संग्राम जगताप

दक्षिण भागाचा आमचा परिचय आहे. उपलब्ध असणार आमदार अशी माझी प्रतिमा आहे. मी विकासासाठी कायम प्रयत्न करत असल्याचे संग्राम जगताप म्हणाले.

संग्राम जगताप यांचे वडील अरुण जगताप हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तसेच संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. शरद पवारांनी पूर्ण राजकीय गणिताचा विचार करून शिवाजी कर्डीलेंचे जावई असलेले संग्राम यांना उमेदवारी घोषित करत विखे गटाला योग्य संदेश दिला आहे. कर्डीले यांनी आपण भाजप उमेदवाराचेच काम करू असे या अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक निकाल लागेपर्यंत उत्कंठावर्धक होणार हे मात्र निश्चित.

आमदार संग्राम यांची उमेदवारी घोषित होताच शहरात जल्लोष सुरू झाला आहे. खास करून जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या माळीवाडा भागात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details