अहमदनगर - राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकर्यांना युरिया व इतर रासायनिक खतांची गरज भासतीय. खत निर्मिती व वितरण व्यवस्था ही केंद्र सरकारच्या अधिकारात असल्याने केंद्राने महाराष्ट्रासाठी आवश्यक मागणीनुसार तातडीनेयुरिया व अन्य खतं उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी तहसीलदार अमोल निकम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बाबा ओहोळ, अॅड.नानासाहेब शिंदे, अॅड.अशोक हजारे, अॅड.सुहास आहेर,आदी उपस्थित होते.
युरिया व इतर रासायनिक खत निर्मिती आणि वितरण व्यवस्था ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत असते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्यांच्या पाठीशी उभे असून त्यांना तातडीने व शेताच्या बांधावर खत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र युरिया व इतर रासायनिक खतांची निर्मिती व वितरण व्यवस्था ही केंद्राच्या अंतर्गत असल्याने राय सरकारचा नाईलाज होत आहे, असे मत बाबा ओहोळ यांनी मांडले.