महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांची विदेशभरारी.. कोपरगावच्या समता आंतरराष्ट्रीय स्कूलची सहल थेट जपानच्या दारी

जपानमधील नागरिकांशी त्यांच्याच भाषेत संभाषण करण्यासाठी जपानी भाषेचे धडेही विद्यार्थ्यांनी गिरवले जात आहेत. पहिल्यांदाचा विमानवारी घडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

By

Published : Apr 10, 2019, 11:28 AM IST

विद्यार्थ्यांची विदेशभरारी

अहमदनगर - कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक सहल थेट जपानला जाणार आहे. सांस्कृतिक आणि दोन देशातील विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने सहलीचे आयोजन केले आहे. परदेशात विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी ही ग्रामीण भागातील कदाचित पहिली शाळा ठरणार आहे.

विद्यार्थ्यांची विदेशभरारी

सहल म्हटले की, नजरेसमोर येतात ते गडकिल्ले, समुद्र किनारे, पर्यटनस्थळे किंवा धार्मिक स्थळे, मात्र कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कूलने या सगळ्यांना फाटा देत थेट जापानला सहल नेण्याचे ठरविले. या सहलीमध्ये २८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जपानमधील नागरिकांशी त्यांच्याच भाषेत संभाषण करण्यासाठी जपानी भाषेचे धडेही विद्यार्थ्यांनी गिरवले जात आहेत. पहिल्यांदाचा विमानवारी घडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाच वातावरण आहे. शहरी भागातील शाळेंप्रमाणेच आता ग्रामीण भागातील शाळाही परदेशात सहलींचे आयोजन करत आहेत. देशातील महत्वाच्या ठिकाणी सहली नेण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना परदेशात नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोपरगाव येथील समता इंटरनेशनल स्कुलने एक पाऊल पुढे टाकले आहे. एक लाख १० हजार सहलीची फी आकारण्यात आले आहेत. शेतकरी कुटूंबासह व्यवसायिक तसेच नोकरी करणाऱया मध्यमवर्गीय कुटूंबाचा समावेश आहे. कुटूंबातील कोणीही यापूर्वी विदेशवारी न केलेल्या पालकांनी या उपक्रमाच स्वागत केले आहे. विशेष म्हणजे या सहलीत मुलींचे प्रमाण अधिक आहे.
या सहलीच्या माध्यमातून मुलांना नवीन विश्व पहावयास मिळणार आहे. ही केवळ सहल नसून या सहलीत दोन देशातील सांस्कृतिक तसेच वैचारांची देवाणघेवाण होणार असल्याचे समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे ईटीव्हीशी बोलताना म्हणाल्या.

सहलीच्या माध्यमातुन मुलांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. तेथील संस्कृती , तंत्रज्ञान , शिक्षणव्यवस्था , जपानी लोकांची देशाप्रती आस्था असे नव विश्व विद्यार्थ्यांना अनुभवयास मिळेल, आणि याचा उपयोग एक आदर्श ध्येयवादी पिढी घडण्यास त्याचा उपयोग होईल यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details